१) गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करणे. २) आजी विद्यार्थ्यांना खेळ व खेळासाठी मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य देणे. ३) सर्व आजी व माजी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास साठी मार्गदर्शन व उपक्रम राबविणे. ४) दहावी नंतर पुढे काय ? शैक्षणिक वाटा व त्याचे मार्गदर्शन करणे. ५) आजी विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात आरोग्य शिबीर आयोजित करणे. ६) सर्व माजी विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी योग्य ती मदत करणे आणि मार्गदर्शन करणे. ७) सर्व व्यापारी माजी विद्यार्थ्यांची सूची तयार करून त्यांच्या व्यापारवाढीस हातभार लावणे. ८) सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करणे. ९) सर्व माजी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जपण्यास प्रवृत्त करणे.